कॉंग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री अखेर भाजपमध्ये दाखल

माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग भाजपमध्येमुंबई : काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरअध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपा शंकर सिंग यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. '370 कलमाच्या जनजागृतीसाठी काम केले म्हणून त्यांना प्रवेश दिला' असंही फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी यतीन कदम यांनीही प्रवेश केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post