सचिन शिंदे यांची कामगार तलाठी म्हणून नियुक्ती डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 सचिन शिंदे यांची कामगार तलाठी म्हणून नियुक्ती

डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कारशिंदे यांचे कार्य व वाटचाल गावातील युवकांसाठी प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील भारतीय नौदलाचे माजी आरोग्य अधिकारी सचिन शिंदे यांची कामगार तलाठी म्हणून नियुक्तीझाल्याबद्दल त्यांचा स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी शेख, मयुर काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.   

पै. नाना डोंगरे म्हणाले की, भारतीय नौदलात कर्तव्य बजावून सेवानिवृत्तीनंतर सचिन शिंदे यांनी शांत न बसता परीक्षा देऊन पुन्हा शासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी परिश्रम घेऊन यश मिळवले असून, त्यांचे कार्य व वाटचाल गावातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी सचिन शिंदे हे गावाचे भुषण असून, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला यश आले आहे. काम करण्याची आवड असल्यास वय व इतर गोष्टी गौण ठरतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिध्द करुन दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक दिलावर शेख यांनी शिंदे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post