साईबाबा संस्थानवर नात्यागोत्यांनाच स्थान, सर्वसामान्य स्थानिकांना संधी मिळण्याची अपेक्षा

साईबाबा संस्थानवर नात्यागोत्यांनाच स्थान, सर्वसामान्य स्थानिकांना संधी मिळण्याची अपेक्षा साईबाबा संस्थान सध्या संभाव्य विश्वस्त यादीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेच्या वाट्याला गेलेले आहे. मध्यंतरीच्या काळात सोशल मेडियावर फिरली गेलेली संभाव्य यादी चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली..माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते यांनी सदरच्या संभाव्य यादीचा पुरता लेखाजोखा सर्वांसमोर मांडला आणि सरकारला जाग आली. या यादीचा विचारच करायचा झाला तर निव्वळ आपल्या जवळच्याच नातेवाईकाची वर्णी कशी लावता येईल असाच जवळपास तिनही पक्षांनी प्रयत्न केला आणि सोयीस्कर आपल्याच पक्ष्याच्या प्रामाणिक स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला.

शिर्डीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांचे नाव संभाव्य यादीमध्ये न येणे हे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांना न रुचणारे होते. शिवाय त्यांच्या नावांसाठी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे आग्रही असल्याचे समजते. त्यांच्या शिवाय रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे हे देखील स्थानिक पदाधिकारी इच्छुक आहेत.याशिवाय शिवसेनेच्या स्थानिक गोटात देखील प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.यामध्ये शिवसेनेचे कमलाकर कोते व माजी नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांना न्याय मिळवा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.कॉंग्रेसमधील यादीचा विचार केला तर यामध्ये देखील नात्यागोत्याचं वलय दिसून येत आहे. शिर्डीच्या परिसरातील कार्यकर्त्यांची साईबाबा संस्थान मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वर्णी लागावी अशीच भावना तिनही पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची आहे. याठिकाणी येणारे भक्तमंडळ चारित्र्यवान आणि गुन्हेगार विरहित असाव हीच साईभक्तांची माफक अपेक्षा.

1/Post a Comment/Comments

  1. आमदार खासदार किंवा कोणत्याही राजकीय पुढा-याला यात न घेता...सुशिक्षीत,अनुभवी व्यक्तीना प्राधान्य द्यायला हवे,तसेच महाराष्ट्र तसेच देशभरात साई मंदीर आहेत त्यांच्याही पैकी कोणाला स्थान द्यावे.
    राजकरण्यांनी आपआपले मतदार संघात साई मंदीर उभारून त्यातुन mpsc,upsc चे वर्ग चालवुन ,अथवा हाॅस्पीटल उभारावे,ख-या अर्थाने बाबांची सेवा करावी

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post