दारूची दुकाने चालू, पण मंदिरे बंद असल्याने वाईट वाटतं

दारूची दुकाने चालू, पण मंदिरे बंद असल्याने वाईट वाटतं

 


नगर:  राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असले, तरी मंदिरे, धार्मिक स्थळे अद्याप बंदच आहे. यावरून प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी खंत व्यक्त केली आहे. दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचे वाईट वाटते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.

कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल गावात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.


कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या महामारीमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तरीही यामधूनही शहाणपण कोणाला आल्याचे दिसून येत नाही. आजही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा येऊन गेल्या, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे समाजामध्ये दारूपासून सर्व काही सुरू आहे. परंतु फक्त देवाची प्रार्थना आणि मंदिरे बंद आहेत, याचे वाईट वाटते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post