नगरवर करोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट, महापौरांनी केले मोठे आवाहन

 कोरोनाच्‍या तिस-या लाटेची शक्‍यता.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये - महापौर रोहिणी शेंडगे 

कोरोनाच्‍या तिस-या लाट येण्‍याची शक्‍यता तज्ञानी व्‍यक्‍त केली. त्‍या दृष्टिने मनपाच्‍या वतीने उपाय योजना करण्‍यासाठी महापौर रोहिणी शेंडगे, यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्‍त शंकर गोरे,उपमहापौर गणेश भोसले, स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक अनिल शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संभाजी कदम, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपायुक्‍त यशवंत डांगे, वैद्यकिय आरोग्‍याधिकारी डॉ. सतिष राजूरकर, डॉ. नलिनी थोरात, डॉ.गणेश मोहळकर, डॉ. एस.व्‍ही.चेलवा, डॉ. माधुरी गाडे, डॉ. आरती डापसे, डॉ.‍ कविता माने, डॉ. आएशा शेख आदी उपस्थित होते.

      यावेळी महापौर शेंडगे यांनी कोरोना आजारा बाबत माहिती घेतली असता पेशंटची संख्‍या दिवसें दिवस वाढत आहे. मनपाच्‍या वतीने तिस-या लाटेच्‍या दृष्टिने उपाय योजनो करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. सध्‍या मनपाचे दोन कोवीड सेंटर सुरू असून आणखी आवश्‍यकता भासल्‍या दोन दिवसात कोवीड सेंटर उभारण्‍याच्‍या दृष्टिने नियोजन करण्‍यात आले आहे.  नागरिक विनाकारण बाजारात ,रस्‍त्‍यावर गर्दी करित आहेत. यामुळे पुन्‍हा कोरोना प्रादुर्भाव वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. आवश्‍यक असल्‍यासच घराबाहेर पडावे. असेही त्‍या यावेळी म्‍हणाल्‍या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर लस घेतली पाहिजे.  अहमदनगर शहरासाठी जास्‍तीत जास्‍त लस पुरवठा होण्‍यासाठी मा.शासनाकडे मागणी करण्‍यात येणार आहे. मनपाच्‍या वतीने 65 वर्षा पुढील आजारी  नागरिक ज्‍यांना चालता येत नाही, बेड रेस्‍ट आहे अशा नागरिकांना लसीकरण घरोघर जावून करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या.  ऑक्‍सीजन प्‍लॅट बाबत माहिती घेतली असता येत्‍या 8 ते 10 दिवसात लिक्‍वीड ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍टचे काम सुरू करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे भविष्‍यात ऑक्‍सीजनची आवश्‍यकता भासल्‍यास ऑक्‍सीजन उपलब्‍ध होईल त्‍यादृष्टिने कार्यवाही सुरू आहे.   तसेच सावेडी उपनगर भागासाठी विद्युत दाहिनी सुध्‍दा लवकरात लवकर कार्यान्‍वीत होणार आहे. गोर गरिब व गरजू नागरिकांसाठी सर्व सोयी युक्‍त दवाखाना असणे आवश्‍यक आहे. यादृष्टिने मनपाच्‍या माध्‍यमातून 500 बेडचे हॉस्‍पीटल सुरू करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. कोरोना प्रादुर्भावचा धोका टाळण्‍यासाठी सामाजिक अंतर, मास्‍क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे.  

      यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले की, विनायक नगर, बुरूडगांव रोड, या भागातील नागरिकांची घरोघर जावून कोवीडची तपासणी करावी. मनपाच्‍या लसीकरण केंद्रसाठी जास्‍तीत जास्‍त लस उपलब्‍ध करून देण्‍यात यावी रूग्‍णांची संख्‍या वाढू नये यासाठी जास्‍तीत जास्‍त टेस्‍टींग करण्‍याच्‍या सुचना केल्‍या. मागील कोरोनाच्‍या काळात ऑक्‍सीजन बेड रूग्‍णांना वेळेवर मिळत नव्‍हते. संभाव्‍य तिस-या लाटेची शक्‍यता असल्‍यामुळे ऑक्‍सीजन बेड जास्‍तीत जास्‍त उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्टिने प्रशासनाने कार्यवाही करावी.

      यावेळी आयुक्‍त श्री.शंकर गोरे  यांनी वैद्यकिय आरोग्‍याधिकारी यांना सुचना केल्‍या की, प्रत्‍येक लसीकरण केंद्रावर तपासणी करून नागरिकांना लस देण्‍यात येते की नाही याची खात्री करावी. येणा-या संभाव्‍य लाटेबाबत मी स्‍वत: शहरात व उपनगरात फिरून माहिती घेत आहे. ज्‍या भागामध्‍ये पेशंट वाढले आहे. त्‍या ठिकाणी कॅन्‍टामेंट झोन करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. जास्‍तीत जास्‍त टेस्‍टींग करण्‍याच्‍या सुचना देखील देण्‍यात आल्‍या. नागरिकांनी विनाकारण फिरू नये.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post