गावकर्‍यांनी सरपंचाला गाढवावर बसवून काढली मिरवणूक...कारण ऐकून व्हाल हैराण...

गावकर्‍यांनी सरपंचाला गाढवावर बसवून काढली मिरवणूक

 


नवी दिल्ली - चांगला पाऊस पडावा यासाठी विविध गोष्टी केल्या जातात.  मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातही अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खूश करण्यासाठी गावच्या सरपंचांना थेट गाढवावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांना आशा आहे. 

गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. याच दरम्यान विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी गोष्ट करण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा यांना गाढवावर बसवून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं. हार घालून त्यांची खास गाढवावरून मिरवणूकचं काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post