एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडी सरकारच अडचणीत आणतेय

महाविकास आघाडीच खडसेंना अडचणीत आणतेय, प्रविण दरेकर यांचा दावामुंबई : "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी सुरु आहे. त्यांना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. मला वाटतंय, झोटींग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे.", आशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी झोटींग समितीचा अहवाल गायब होण्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, "आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post