सीबीआयच्या मुख्यालयाला मोठी आग...अधिकारी, कर्मचारी इमारतीबाहेर

सीबीआयच्या मुख्यालयाला मोठी आग...अधिकारी, कर्मचारी इमारतीबाहेर नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआय  मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. 

फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post