जन्मदात्या आईची निर्घुण हत्या करणार्‍या सैतानाला फाशीची शिक्षा

जन्मदात्या आईची निर्घुण हत्या करणार्‍या सैतानाला फाशीची शिक्षा कोल्हापूर : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या कोल्हापूरच्या घटनेचा अखेर निकाल लागला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आईचा खून करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अखेर कोल्हापूर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.


2017 मध्ये दोषी सुनील रामा कुचीकोरवी या सैतानाने आपल्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा 4 वर्षांनंतर निकाल लागला आहे.कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात  न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीशांनी या प्रकरणात सुनील कुणीकोरवीला दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post