मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज... फडणवीस म्हणाले...

मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे नाराज... फडणवीस म्हणाले... नाशिक: केंद्रात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भगिनींनी एकाही मंत्र्याचं अभिनंदन न केल्याने तर त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते भडकले. कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले असता मीडियाने त्यांना गराडा घातला. यावेळी त्यांना काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज नाही तर मग मुंडे भगिनींनी ट्विट का केलं नाही?, असा सवालही फडणवीसांना करण्यात आला. या प्रश्नावर फडणवीस काहीसे भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post