हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार - आ.राधाकृष्ण विखे पाटील

 

 हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार - आ.राधाकृष्ण विखे पाटीलमुंबई दि ६ प्रतिनिधी -  महाविकास आघाडी सरकारने सदस्यांना सभागृहात बोलू न देता  आवाज दडपण्याचा केलेला प्रयत्न हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून,जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरून सरकारच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणतील असा इशारा भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिरूप विधानसभेतून दिला.


विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बारा सदस्यांचे निलंबन केले.आज दुसऱ्या दिवशी भाजप विधीमंडळ पक्षाने सर्व कामकाजावर बहिष्कार टाकून विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा भरवली.जेष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या  या विधानसभेत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी .सरकारवर जोरदार हल्ला चढवला.


कालच्या घटनेन लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले.सदस्यांना बोलूच द्यायचे नाही आशी नवी परंपरा यांनी निर्माण केली.पण जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला.


महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे.दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नाही.पाच रुपये अनुदान कोणाच्या खिशात गेले असा प्रश्न उपस्थित करून पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लूटले तरी हे सरकार शांत बसल्याचा आरोप आ.विखे यांनी केला.


केंद्र सरकारने केलेलै कृषी कायदे हेच शेतकर्यांच्या हिताचे असल्याचा उल्लेख करुन आ.विखे पाटील म्हणाले की उत्पादनापासून ते विक्री पर्यतच्या  सर्व प्रक्रीयेत शेतकरी हित जोपासले आहे.राज्य सरकारचे कायदे हे राजकीय हेतूने प्रेरीत असून केंद्रात शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी सुरूवातीला हे कायदे आणले याचा सोयीस्कर विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला.


मराठा आणि ओबीसी आरक्षण घालविण्यास राज्य सरकारच जबाबदार असून या सरकारचा निष्काळजीपणा समाजाला भोगण्याची वेळ आली आहे.पण भाजप आरक्षणाच्या प्रश्नावर स्वस्थ बसणार नाही.आरक्षणाच्या   प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवण्याचा  इशारा आ.विखे यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post