धक्कादायक...गाडी वाचविण्याच्या नादात युवक गेला पुरात वाहून...व्हिडिओ

 

धक्कादायक...गाडी वाचविण्याच्या नादात युवक गेला पुरात वाहून...व्हिडिओवर्धा - विदर्भातही पावसाची संततधार सुरूच असून अनेक नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. तर, गावातील ओढे, बंधारे पाण्याने भरल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही जीव धोक्यात घालून नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. 


जिल्ह्यातील अशाच एका दुर्घटनेत दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीसह युवकही पुलावरुन वाहून गेला आहे. आपल्या मित्राने पुलावरील पाण्यातून गाडी घातल्यानंतर त्याला ती आवरणं शक्य होईना. त्यावेळी, पाठिमागे असलेला मित्र मित्राच्या मदतीला धावून आला. त्याने मित्रासह गाडीला धरले आणि पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र, थोडे पुढे जाताच पुन्हा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मित्राच्या हातातून सटकली. त्यावेळी, पाठिमागील मित्राने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी गाडीसह तोही पुराच्या पाण्यात वाहून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post