दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग


 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याचे समजते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post