पुराच्या पाण्यात उतरून राज्यमंत्री आदिती तटकरेंनी केले मदतकार्य

 पुराच्या पाण्यात उतरून राज्यमंत्री आदिती तटकरेंनी केले मदतकार्यमहाड : महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी स्वत: मैदानात उतरुन मदतकार्य केले. बचाव पथकासह घटनास्थळी जावून त्यांनी मदतकार्याचा आढावा घेत सूचना केल्या. महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहर तसेच लगतच्या परिसरात पाणी साचले आहे. याठिकाणी प्रत्यक्षात हजर राहून पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी लगतच्या दासगाव व केंबुर्ली परिसरात साळुंखे रेस्क्यू टिमने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत सुखरूप ठिकाणी हलविले. नागरीकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post