देशातून करोना हटेना...रूग्णवाढीमुळे चिंता कायम

देशातून करोना हटेना...रूग्णवाढीमुळे चिंता कायम

 


देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 1 हजाराने घट झाली. कालच्या दिवसात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सापडणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा काही दिवसांपूर्वी तीस हजारापर्यंत खाली पोहोचला होता, मात्र त्यानंतर पुन्हा होत असलेली वाढ धडकी भरवणारी आहे. सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही सलग दोन दिवस वाढ होत आहे. आदल्या दिवशी 3 हजार 998 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले होते. हा आकडा काल पुन्हा जवळपास 3500 नी घटून 507 वर आला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 652 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post