जि. प. शाळेच्या विद्यार्थ्याच्या आवाज आकाशवाणीवर..!

 राज्यस्तरीय स्पर्धेत हॅट्ट्रिक,आकाशवाणी केंद्राने घेतली दखल!


जि. प. तुळापूर शाळेच्या विद्यार्थ्याच्या आवाज आकाशवाणी केंद्रावर..!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुळापुर, तालुका राहुरी या शाळेतील इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी  विराज विवेकानंद खामकर याची 'बालमेळा' या कार्यक्रमांतर्गत  आकाशवाणी च्या अहमदनगर केंद्रावर मुलाखत घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या तीन राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रंमांक पटकावत विराज ने यशाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.या त्याच्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल अहमदनगर आकाशवाणी केंद्राने घेतली आहे. आकाशवाणी केंद्राच्या वरीष्ठ उदघोषिका वृषाली पोंधे ह्यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे प्रसारण दिनांक 17 जुलै, शनिवार  रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. न्युज ऑन एअर या अँप वर आणि रेडिओ च्या 100.1 मेगाहर्ट्सवर  वर  हे प्रसारण होणार आहे.कोविड-19 आजारामुळे  प्रत्यक्ष रुपात शाळा सुरू झाल्याच नाही मात्र  ऑनलाइन शिक्षण, शिक्षक, आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून विराजने हे  यश संपादन केले आहे.  राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेत, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बालगटात प्रथम येण्याचा बहुमान विराजने संपादित केला आहे.याबरोबरच लीप फॉरवर्ड,मुंबई या संस्थेच्या वतीने  घेण्यात आलेल्या 'राज्यस्तरीय वर्ड पॉवर चॅम्पियनशिप' स्पर्धेत ही विराजने बालवयात म्हणजेच इयत्ता पहिलीत असतांनाच राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच नुकत्याच झालेल्या बालसंस्कार समूह महाराष्ट्र, आयोजित राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ही विराज ने अव्वल क्रमांकावर आपली मोहर उमटवली आहे.त्याच्या या यशाच्या हॅट्ट्रिक बद्दल  आणि उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराजने आपल्या तुळापूर शाळेसोबतच,राहुरी तालुका व अहमदनगर जिल्हाचे नाव राज्यात उंचावले आहे. बालवयातच त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.बालवयातील त्याचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.त्याबद्दल त्याचे राज्यभरातून कौतुक होत आहे.विविध वृत्तपत्रे ,मासिक आणि ऑनलाइन मुलाखतींद्वारे विराज चे अभिनंदन होत आहे.विराजला वर्गशिक्षक श्री.विवेकानंद खामकर व मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ भांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री.साहेबराव अनाप, राज्य आदर्श शिक्षक श्री.राजेंद्र बोकंद,  उपक्रमशिल शिक्षक श्री.रवींद्र अरगडे,  केंद्रप्रमुख श्री.शंकर गाडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी अनिता निऱ्हाळी व राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.सुनील सूर्यवंशी यांनी विराजचे  विशेष अभिनंदन केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post