मनसे बनणार भाजपचा नवा भिडू! देवेंद्र फडणवीस म्हणाले....

 मनसे बनणार भाजपचा नवा भिडू! देवेंद्र फडणवीस म्हणाले....नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेसोबतच्या युतीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. मनसेने परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सोडला तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याकडे फडणवीसांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, मनसेसोबत युती करण्याचा निर्णय योग्यवेळी होईल. अजून त्याला वेळ आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंही त्यांनी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post