पंकजा मुंडेंना मोठा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील

  पंकजा मुंडेंना मोठा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील



 बीड : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. ही कारवाई म्हणजे पंकजा मुंडे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post