नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग खड्डयांमध्ये हरवला...

 नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर मधील खड्डे व मैलामिश्रीत पाण्याचा प्रश्न मार्गी लावा


स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात- दत्ता गाडळकर
नगर - नगर-कल्याण महामार्ग हा नगर शहरातून जात आहे या रस्त्यावर वर्षानुवर्ष मैलामिश्रित पाणी वाहत असते याच बरोबर खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, या शिवाजीनगर परिसरातून वाहणार्‍या ड्रेनेज लाईन रस्त्याच्या बाजूने गेली आहे वारंवार तुंबून मैलामिश्रित पाणी वर्षभर रस्त्यावर वाहत असते, या परिसरामध्ये मोठी नागरी वस्ती असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ड्रेनेजच्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी मनपाने ड्रेनेज लाईनचे दुरुस्ती करावी, जेणेकरून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येणार नाही या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक प्रवास करीत असताना या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे, तर काही नागरिकांचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाही तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्याचे पॅचिंग केले जाते पुन्हा आठवड्याभरातच त्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते तरी प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गाडळकर यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post