लोकसभा निवडणूक लढण्याचीही तयारी...आ.लंके यांचे विखेंना थेट आव्हान

लोकसभा निवडणूक लढण्याचीही तयारी...आ.लंके यांचे विखेंना थेट आव्हाननगर : आधी पारनेर तालुक्यातील काही नेते मला विरोधक मानून टीका करीत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना मी विरोधक वाटू लागल्याने तेही टीका करू लागले आहेत. त्यांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. मात्र, वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत, अशा शब्दांत नगर-पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.

\ पारनेर तालुक्यातील पळशी येथील एका कार्यक्रमात लंके बोलत होते. लंके म्हणाले, माझ्याकडे कोणत्याही संस्था नाहीत. कारखाने नाहीत. हॉस्पिटल नाही. माझ्याकडे फक्त जिवाभावाची माणसे आहेत. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरीही मी घाबरत नाही. आमच्या कोविड सेंटरवर टीका करणाऱ्यांनी येथील काम पाहावे. आतापर्यंत या कोविड सेंटरमधून १७ हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. यातून लोकांचे १८५ कोटी रुपये वाचले आहेत, असेही लंके म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post