संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री, शिवसेनेच्या मंत्र्याला विश्वास

संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री, शिवसेनेच्या मंत्र्याला विश्वास वर्धा : संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.  उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात १८ ते ४६ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजन केले होते. पण, केंद्र सरकारने ती जबाबदारी घेतली. काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागत लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण, केंद्राकडून लशीचा पाहिजे तसा पुरवठा होत नसल्याने तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. यवतमाळला केंद्र सरकारने दिलेल्या ३५ पैकी १४ व्हेंटिलेटर बंद पडले असल्याचेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post