संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा

 संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करामुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. “संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. इतकंच नाही तर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”, असं खरात म्हणाले.


सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post