नेवासा तालुक्यात आता घराघरात शाळा

 भालगाव - नेवासा मध्ये आता घराघरात शाळा


  उपक्रमशील उपशिक्षिका सुनिता निकम - कोरडे यांचा उपक्रम , 13 विद्यार्थी इंग्रजी माध्यमामधून जिल्हा परिषद शाळेत     नगर-   कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु विद्यार्थ्याना घरातच शाळेचे वातावरण मिळावे यासाठी नेवासा तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुनीता निकम- कोरडे यांनी घरोघरी शाळा हा उपक्रम राबविला आहे.  विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्या घरातच वर्गासारखी  वातावरणाची निर्मिती करून घरा घरात शाळा बनविण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना काळाच्या शाळा बंद असल्याने सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तसेच आर्थिक स्थिती मुळे अँड्रॉइड मोबाइल घेणे शक्य नाही .त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत. यावर उपाय म्हणून  सुनीता निकम - कोरडे यांनी कोरोना नियमाचे पालन करून आजपर्यंत 151 विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेत त्यांना ऑफलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. . सर्व विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप केले आहे.  यावेळी पालकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करत  विद्यार्थ्यांच्या घरातील भिंतीवर विद्यार्थ्यांची पूर्ण नाव,  शाळेचे पूर्ण नाव ,इयत्ता व विद्यार्थ्यांचा आकर्षक फोटो यासह विविध शैक्षणिक तक्ते आकर्षक पद्धतीने लावून विद्यार्थ्यांच्या घरालाच शाळेचे स्वरूप दिले आहे.

विद्यार्थ्याच्या घराबाहेरील परिसरातही विद्यार्थी आणि पालक यांच्या मदतीने शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे .या शाळेत विद्यार्थी पालकांच्या मदतीने हसत-खेळत आपले शिक्षण घेत आहेत. घरोघरी शाळेतून प्रौढ 70 वर्षाची आजी आजोबाही  भिंतीवरील तक्क्यांचा वाचन करण्याचा आनंद घेऊ लागली.या उपक्रमास भालगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ,सर्व सहकारी शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत आहे .घरोघरी शाळा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक  करण्यात  येत आहे.

जिल्हा परिषद भालगाव शाळेत नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम सुरू असतात., त्यातून विद्यार्थ्यांची  प्रगती सुरू असते.मराठी शाळेतील विद्यार्थीची प्रगती पाहून इंग्रजी माध्यमातील पालकांनाही जिल्हा परिषद शाळेचे आकर्षण वाटू लागले आहे.त्यामुळे 13 विद्यार्थी नी इंग्रजी माध्यम सोडून  जिल्हा परिषद शाळा भालगाव मध्ये प्रवेश घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post