नगर बाजार समितीच्या वतीने बुधवारी रक्तदान महाअभियान

 नगर बाजार समितीच्या वतीने बुधवारी रक्तदान महाअभियान लोकमतच्या रक्तदान महाअभियान अंतर्गत मा . खा . दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या वतीने बुधवार दि .७ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सभापती अभिलाष घिगे व उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिली .

' लोकमत ' चे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत . लोकमतचे ' रक्ताचे नातं ' हे अभियान राज्यभर सुरू आहे . नगर बाजार समितीच्या वतीने ही वेळेची गरज आणि सामाजीक भान जपत रक्तदानाचे महत्त्व समजुन घेत रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यत आयोजीत करण्यात आले आहे .

या शिबिराचे उदघाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार असुन यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . सध्या कोरोनाचा प्रभाव व इतर शस्त्रक्रिया सुरू आहेत . त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने नगर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन घिगे व म्हस्के यांनी केले आहे . यात तालुक्यातील शेतकरी , व्यापारी , आडतेदार  , हमाल , मापाडी , विविध  सेवा संस्थाचे पदाधिकारी व सचिव , विविध गावचे सरपंच व त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post