तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का !!

 तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!केमिकलचा वापर करुन भाज्या ताज्या करणारा व्हिडीओ व्हायरल

अंबरनाथ : तुम्ही भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारात जाता. ताज्या, चांगल्या आणि आरोग्यदायी भाज्यांसाठी तुम्ही जास्तीचे पैसे मोजायलाही तयार असता. मात्र, सावधान… सुकलेल्या कुजलेल्या भाज्याही तुम्हाला ताज्या असल्याचं भासवून विकल्या जात आहेत. त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पूर्णपणे सुकलेल्या भाज्या हिरव्यागार आणि टवटवीत करणारं एक केमिकल वापरलं जात आहे. त्याद्वारे सुकलेल्या भाज्याही ताज्या असल्याचं भासवून तुम्हाला विकल्या जात आहेत. 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बाजारात गेल्यानंतर हिरव्यागार आणि टवटवीत पालेभाज्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश असावा, असं डॉक्टर देखील सांगतात. मात्र आपण घरी आलेल्या पालेभाज्या या हिरव्यागार आणि टवटवीत कशा होतात? याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अगदी सुकलेल्या अवस्थेतील भाज्यांना अवघ्या दोनच मिनिटात टवटवीत करणारं एक रसायन सध्या बाजारात उपलब्ध झालंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post