पटोलेंचा शिवसेनेला दणका, माजी राज्यमंत्री सोडणार शिवबंधन

 पटोलेंचा शिवसेनेला दणका, माजी राज्यमंत्री शिंदे सोडणार शिवबंधनशिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे  हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.


ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post