डॉ.दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांच्या समर्थनार्थ आरोग्य कर्मचारी एकवटले

 आरोग्य विभागातील कार्यरत विविध संवर्गातील कर्मचारीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन.                                                                                   

 तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्यावर केलेल्या आरोप चुकीचे व असमर्थनीय असल्याचा आरोप.                                                                                      नगर -  पाथर्डी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश शेळके यांनी केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणातून असून यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काहीच दोष नसल्याचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी संजय नरवडे, गणेश जंगम,  संदीप अकोलकर, श्रीमती बयोबी पठाण, ललिता कासोळे,सुभाष कुलकर्णी, शिवाजी पालवे आदी सह आरोग्य विभागातील कार्यरत विविध संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाथर्डी तालुका येथील करंजी आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्र इमारत येथे गळफास घेऊन आत्महत्या केली व चिठ्ठी लिहिली त्यामध्ये त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे तहसीलदार व जिल्हाधिकारी नाव घेतल असुन तसेच कामाचा अतिरिक्त ताण पगार वेळेवर न होणे पगार कपातीच्या धमक्या देणे असे लिहिले आहे घटना अतिशय दुःखद आहे तसेच आमच्या साठी वेदनादायी परंतु अकल्पनीयही आहे कारण तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांच्या विषयीचे आरोप अतिशय चुकीचे व असमर्थनीय आहे दराडे कर्तव्यतत्पर व सर्व आरोग्य कर्मचारी यांना व त्यांच्या कार्यालयीन सामाजिक व घरगुती कुठलेही अडचणीत नेहमी पाठीशी उभे राहणारे कर्मचारी अधिकारी असताना त्यांच्यावर झालेले आरोप त्यांच्यासह आम्हालाही अतिशय वेदनादायी आहे.

 आरोग्य अधिकारी हे पद निव्वळ कंत्राटी रूपातील आहे व  नेमून दिलेल्या कामकाज पैकी साध्य करण्यात आलेल्या कामानुसार त्या प्रमाणात आदा करण्याच्या तरतूद आहेत. म्हणून जर एखादा कर्मचारी नेमून दिलेले काम करत नसेल तर त्याला त्या कामाचा मोबदला दिला जाणार नाही. ही कल्पना देणे पगार कपात करण्याची धमकी असू शकते.  

शासकीय कामकाज करताना अधिकारी हे आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून कामकाज करून घेतात व आपले कर्तव्य बजावतात. परंतु यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यास आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना वाटल्यास ती सर्वांचीच भावना असेल असेही नसते व त्या संबंधित कर्मचारी यांनी तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे अवगत करणे निश्चितच आवश्यक आहे. 

 तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, परीचर, सफाई कामगार, ड्रायव्हर, अशा अर्धवेळ स्त्री परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी इत्यादी पदे येतात. या सर्व पैकी जर कोणाचे वेतन अदा करण्यास उशीर होत असेल तर तशी तक्रार लेखी व तोंडी कल्पना आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना देणे ही संबंधितांची जबाबदारी असते.  या सर्व प्रकरणामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण कायद्याप्रमाणे जे योग्य असेल तीच भूमिका घ्यायला अशी आमची खात्री आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post