प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नगर जिल्ह्यातील ५ कोटी ७८ लाखांचे अनुदान जमा

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नगर जिल्ह्यातील ५ कोटी ७८ लाखांचे अनुदान जमा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे अस्तरीकरण बाबीचे अहमदनगर जिल्ह्यातील 5 कोटी 79 लाख प्रलंबित अनुदान जमा

 खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहिती

(अहमदनगर, दि18) केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे अस्तरीकरण या बाबीचे अहमदनगर जिल्ह्यातील  844 शेतकऱ्यांना 5 कोटी एकूण 79 लाख प्रलंबित अनुदान सण 2019-20 या अर्थिक वर्षातील मंजूर झाले असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली.

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे मुख्य ध्येय हे, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोचविणे हे आहे. ज्या  पद्धतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजने योजना प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते  पोचल्याचे उद्दिष्ट ठेवले, त्याच पद्धतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेतात पर्यंत सिंचन पोहोचण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारनेठेवले आहे. 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 844 शेतक-याना शेततळ्याचे अस्तरीकरण साठी  प्रलंबित 5 कोटी 79 लाख रुपयाचे अनुदान जमा होणार असून त्यापैकी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील 519 शेतकऱ्यांना  प्रलंबित अनुदान जमा झाले आहे. नगर तालुका 29. 85 लक्ष, पारनेर तालुका 36.23 लक्ष, पाथर्डी तालुका 29.06 लक्ष, कर्जत तालुका 40.16 लक्ष श्रीगोंदा तालुका 123. 63 लक्ष, जामखेड तालुका 20.09 लक्ष,  राहुरी तालुका 8  लक्ष,शेवगाव 78.10 लक्ष या तालुक्यातील शेतकरी यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदान मंजूर झाले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post