उपमहापौर गणेश भोसले यांची मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांना दिला इशारा

 उपमहापौर गणेश भोसले यांनी सकाळी अचानक  महापालिकेत दिली भेट. 


मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेचे पालन करावे अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईल : उपमहापौर गणेश भोसले नगर : अहमदनगर महानगरपालिकेचे कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय कामकाजांच्या वेळा पाळने गरजेचे आहे. अनेक  अधिकारी व कर्मचारी कामकाजाचे वेळ पाळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अचानक पणे औरंगाबाद रोडवरील मनपा मुख्य कार्यालय भेट दिली, शिपायाची कामकाजाची वेळ सकाळी साडेनऊ वाजता आहे. अधिकारी व कर्मचारी  यांच्या कामकाजाची वेळ ९.४५ आहे मी आज ११ वाजता कार्यालय मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन भेट दिली असता, काही कर्मचारी व अधिकारी वेळेवर न आल्याचे निदर्शनास आले आहे. आज सर्व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात येते की उद्या पासून सर्वांनी  शासकीय वेळेचे पालन करावे अन्यथा निलंबनाला सामोरे जावे लागेल. 
अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे उपस्थित होते. 
         अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेची कामानिमित्त साइटवर जायचं असेल त्यांनी आपल्या कार्यालयाचे संपर्क साधून जाण्याचे कारण सांगावे, यापुढील काळात नगर मनपाचे प्रतिमा उंचव्हायचे आहे. आपण  आपले  कर्तव्यचे  पालन करावे. आपण जनतेचे काम करावे त्यासाठी आपण जनतेचा मोबदला घेतो यापुढील काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका सहन केल्या जाणार नाहीत. तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की शासकीय वेळेचे  पालन करावे उद्यापासून अचानक पणे कोणत्याही प्रभाग कार्यालयात भेट दिली जाईल. याची दक्षता घ्यावी अशी माहिती त्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post