हवामान अलर्ट...महाराष्ट्रात चार दिवस अतिमुसळधार पाऊस

 

महाराष्ट्रात चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाजमुंबई: महाराष्ट्रात दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागाने हवामानाचा अंदाज जारी केला आहे. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या अंदाजासाठी भारतीय हवामान विभागाचे अपडेटस पाहावेत, असं आवाहन हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.


भारतीय हवामान विभागानं राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post