अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा



नगर:  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संदीप नानासाहेब निकम (वय 34 रा. गौतमनगर, रेल्वेस्टेशन, राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला.


11 एप्रिल 2019 रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी घरासमोर बसची वाट पाहत असताना संदीप निकम याने तिच्याशी मोबाईल नंबर देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार देताच संदीपने तिला धमकी देऊन नंबर घेण्यास भाग पाडले. 30 एप्रिल 2019 रोजी संदीप पिडीत मुलीच्या घरी गेला. पिडीत मुलीकडील मोबाईल पाहून तो तिला म्हणाला, मला तु फोन का केला नाही, तु मला फार आवडते. यानंतर पिडीत मुलगी दुचाकीवरून जात असताना संदीपने तिचा हात धरून माझ्यासोबत राहुरीला चल असे म्हणाला. त्यानंतर 16 मे 2019 रोजी पिडीत मुलीची आई घरी असताना संदीपने घरासमोरून चकरा मारल्या.


यावेळी त्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आईला संदीपने शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने एकुण चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकिल मनिषा केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post