माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, खा.विखे यांनी 'यांना' दिला इशारा

 

माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका : खा.विखेनगर: माझ्या चांगुलपणाचा फायदा आता घेऊ नका. लोकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागते. चुका करू नका, अन्यथा आता मला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना दिला आहे.


पाथर्डी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय महामार्ग विभाग व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक विखे पाटील यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी देवदत्त केकाण, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, राहुल राजळे, अजय रक्ताटे, धनंजय कोळेकर उपस्थित होते. 


यावेळी खा. विखे पाटील म्हणाले, लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. रस्त्याचे काम धिम्यागतीने चालू आहे. जुलै 2021 अखेर शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करा. आता लोकभावनेचा अंत पाहु नका. अन्यथा मला कठोर भूमिका घ्यावी लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post