आघाडी सरकारमधील 'या' मंत्र्याची चक्क बारमालक करतो पूजा

 बार मालकाकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजाराज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यामुळे मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे. या आनंदात एक बारमालक तर थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करत आहे. त्याने आपल्या बारमध्ये विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोची बारमालक आरती करत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधाला असल्याचं उघड झालं आहे.

चंद्रपुरात पुन्हा एकदा 750 बार-रेस्टॉरंट सुरु झाले आहेत. दारुबंदी उटळ्यानंतर पहिल्या 3 दिवसात मद्यप्रेमींनी 1 कोटींची दारु रिचवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेली, अशी भावना बारमालकांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक, बारमालक, त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचे हे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया बारमालकांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post