राज्यात बदली प्रक्रिया...राज्य शासनाने काढले आदेश
 शासन निर्णय :सद्यस्थितीत राज्यात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला

नसल्याने तसेच या प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन, सन २०२१-२२ या चालू

आर्थिक वर्षी खालीलप्रमाणे मर्यादित स्वरुपात दिनांक १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत बदल्या करण्यास या

शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. दि. १४ ऑगस्ट २०२१ नंतर कोणत्याही बदल्या अनुज्ञेय

राहणार नाहीत.

१) सद्यस्थितीत महाराष्ट्र हे कोरोनाबाधित राज्य असल्यामुळे व तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता

विचारात घेता, तसेच कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेली महामारी व त्या अनुषंगाने घालण्यात

आलेले अनेक निबंध यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्यामुळे

बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरुपात करण्याच्या दृष्टीने, सर्वसाधारण बदल्या या एकूण

कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढया मर्यादेत, बदली अधिनियमातील कलम ६ मध्ये नमूद केलेल्या

सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात याव्यात.

२) १५ टक्के मर्यादेत सर्वसाधारणा बदल्या करत असताना, संबंधित पदावर विहित कालावधी पूर्ण

झालेल्या सर्व पात्र अधिकारी/कर्मचारी यांच्यापैकी ज्यांचा संबंधित पदावर जास्त कालावधी

पूर्ण झाला आहे अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.

३) सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.

४) सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच, जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त

पदांवरच विशेष कारणास्तव बदल्या दि.१ ऑगस्ट, २०२१ ते दि. १४ ऑगस्ट, २०२१ या

कालावधीपर्यंत अनुज्ञेय राहतील. सबब, जे पद रिक्त नाही अशा पदावरील कार्यरत अधिकारी/

कर्मचारी यांची अन्यत्र बदली करुन अशा पदावर विशेष कारणास्तव बदली करता येणार नाही.

५) विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या, या बदली अधिनियमातील कलम ६ मध्ये नमूद

केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात याव्यात.

६) विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढया मर्यादेत

करण्यात याव्यात.

७) सर्वसाधारण बदल्या तसेच विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या

शिफारशी प्राप्त करण्याची व बदली अधिनियमातील सर्व तरतूदींचे पालन करण्याची दक्षता

घ्यावी.

८) ज्या विभागांमध्ये बदलींची कार्यवाही करण्यासाठी संगणकीय प्रणाली (ऑनलाईन) पुर्णत: किंवा

अंशत: विकसित केली आहे, अशा विभागांनी सदर प्रणालीचा वापर करावा.

९) सर्वसाधारण बदल्या तसेच विशेष कारणास्तव बदल्यांचे आदेश निर्गमित केल्यानंतर, महाराष्ट्र

नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे

यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८२ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधीतच,

बदली झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा

या पदग्रहण अवधीत बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा

अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल.

१०) उपरोक्त नमूद सूचनांनुसार करावयाची कार्यवाही ही दिनांक १४ ऑगस्ट, २०२१ पर्यंत पूर्ण

करण्याची दक्षता घेण्यात यावी.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post