वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदाराचे निधन

 माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन रायगड : वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन झाले आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर ठाकूर हे अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार होते. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते.

त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. 2004 ते 2009 या काळात अलिबाग - उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post