अहमदनगर हळहळले...पाण्यात बुडणार्या तिघांना जीवदान देणारा स्वतः मृत्युशी झुंज हरला....

 अहमदनगर हळहळले...पाण्यात बुडणार्या तिघांना जीवदान देणारा स्वतः मृत्युशी झुंज हरला....नगर : पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी थकून गेल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नगर शहरातील धबधब्यावर हा दुर्दैवी प्रकार घडला. मयूर परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांना जिवदान देणाऱ्या या तरुणाचा दम लागून शेवटी मृत्यू झाल्यामुळे अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. 

 नगर शहरातील काही युवक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी हे तिघेही पाण्यात पोहत होते. मात्र, पोहत असताना या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. हे तिघेही धबधब्यात बुडत होते. हा सर्व प्रकार यावेळी मयूर परदेशी या तरुणाने पाहिला. कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणी एकएक करुन तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहातून तिघांनाही बाहेर काढत असताना मयूर परदेशी थकला. शरीरातील त्राण गेल्यामुळे शेवटी धबधब्याच्या काठावर येईपर्यंत परदेशी याला धाप लागली. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तिघांना वाचवणारा हा तरुण बुडत असताना त्याला सर्वजण पाहत होते. तरुणाला बुडताना पाहून इतरांनी आरडाओरड केली. त्यानंतर काही युवाकांनी मदतीसाठी धबधब्यात उडीदेखील घेतली. मात्र तोपर्यंत परदेशी पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post