लग्न समारंभाला तुफान गर्दी... तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई

 लग्न समारंभाला तुफान गर्दी... तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाईनगर: पारनेर तालुक्यामध्ये सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये तहसीलदार ज्योती देवरे यांनी निर्बंध कडक केले. मात्र, अनेक नागरिक निर्बध पायदळी तुडवत आहेत. पारनेर येथील गणपती फाटा येथे गौरीनंदन मंगल कार्यालयात लग्नसमारंभाला तीनशेहून अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.


पारनेर तालुक्यात 21 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली. तसेच लग्न समारंभ व इतर समारंभासाठी पूर्वपरवानगी काढणे गरजेचे आहे. असे असतानाही गणपती फाटा येथे गौरीनंदन मंगल कार्यालयात पूर्वपरवानगी घेऊन लग्न समारंभ करण्यात आला. 50 व्यक्ती लग्नसमारंभात असणे बंधनकारक होते. मात्र, त्या ठिकाणी तीनशेहून अधिक व्यक्ती उपस्थित होते, तसेच अनेकांनी मास्कही लावला नसल्याचे समजल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने या ठिकाणी भेट देत दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढे पुन्हा या कार्यालयात पन्नास व्यक्तींपेक्षा जास्त लोक आढळून आल्यास कार्यालयावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post