गडकरींनी घेतलेल्या कारखान्यांचीही ईडीकडून चौकशी, भाजप प्रदेशाध्यक्षांचीच मागणी

 गडकरींनी घेतलेल्या कारखान्यांचीही ईडीकडून चौकशी, भाजप प्रदेशाध्यक्षांचीच मागणीमुंबई : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेले विदर्भातील दोन सहकारी साखर कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले. मात्र, प्रदेश भाजपच्या वतीने राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीत या दोन्ही कारखान्यांचाही समावेश आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडली आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. विदर्भातील साखर कारखानदारी जिवंत राहावी यासाठी गडकरींच्या नेतृत्वातील पूर्ती कंपनीने  अनुक्रमे २००९ आणि २०१० मध्ये हे कारखाने लिलावात विकत घेतले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post