....मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? शिवसेनेचा कोल्हेंना सवाल


....मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? शिवसेनेचा कोल्हेंना सवाल पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे  यांनी टोला लगावला. 

“पुण्याच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?” असा सवालही कान्हेरे यांनी विचारला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post