कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा असतो का?

 कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा असतो का? 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खा.कोल्हेंवर खोचक टीकामुंबई : सध्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांचा आशिर्वाद डोक्यावर आहे, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असल्याचं मोठं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होते. खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी समाचार घेत मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

आढळराव पाटील म्हणाले, "तुम्ही जी सत्तेची फळं चाखताय, तुमच्या नेत्यांना जी मंत्रीपद मिळाली, ती शिवसेनेमुळंच मिळाली आहेत असं मी सुद्धा म्हणू शकतो. पण माझा मुजोरपणा नाही. कारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या सहमतीने हे सरकार चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जास्त आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला.

"खासदार अमोल कोल्हेंनी काल अकलेचे तारे तोडले. आपली उंची आणि लायकी ते विसरले. कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा असतो का? असा खोचक टोला देखीस  शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी लगावला. पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी करणारे खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते आणि आणखी एखादा कोणीतरी असेल. बाकी सर्व जण  आघाडीचा धर्म पाळत आहे."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post