तुमचा संगणकीकृत सातबारा अचूक आहे का? प्रशासनाने केले महत्त्वपूर्ण आवाहन

 *संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी असतील तर दुरुस्त करुन घ्या*


*जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन**अहमदनगर:* राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिक कार्यक्रमांतर्गत सात बारा संगणकीकरणाचे कामकाज पुर्ण झालेले आहे. परंतू संगणकीकृत 7/12 मध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदन अथवा तक्रारी शासनाकडे, जमाबंदी, आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत. तसेच अनेक खातेदार ई-मेल व्दारे किंवा दूरध्वनीव्दारे अडचणी मांडतात. काही खातेदार ई हक्क प्रणालीव्दारे 7/12 मधील दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतात. आता हा प्रकल्प अंतिम टप्यात असताना 100 टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरी सर्व नागरिकांनी तलाठी कार्यालयात, तसेच स्मार्टफोन मोबाईल मध्ये ही https://bhulkeh.mahabhumi.gov.in  या वेबसाईटला जाऊन आपला सातबारा अचुक आहे. हे तपासून घ्यावे. 7/12 संगणकीकरणाची अचूकता 100 टक्के साध्य करण्यासाठी तसेच ई-फेर फार प्रणालीत निदर्शनास न येणा-या काही त्रुटी, चुका खातेदार निदर्शनास आणूत देत असतील तर त्यासाठी चुक दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे आणि त्याप्रमाणे तहसिलदार यांचे कलम 155 खाली आदेश काढून 7/12 दुरुस्त करण्यासाठी कार्यालयीन वेळेत अहमदनगर जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये, प्रत्येक महसुली गावांमध्ये शिबीराचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा व संबंधीत तलाठी, मंडळअधिकारी, तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. असे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे. ***

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post