माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आणला निधी, श्रेय लाटतायत विद्यमान मंत्री...

 मा.मंत्री कर्डिले यांनी मंजूर केलेल्या विकास कामाचे मंत्री महोदय लाटता श्रेय -जिल्हा परिषदेच्या सदस्य संध्याताई आठरे


स्वतःला आमदार नामदार म्हणून घेणारे मंत्री महोदयांनी किती आणला मतदारसंघात निधी आठरे यांचा सवालअहमदनगर प्रतिनिधी-मा.मंत्री शिवजीराव कर्डीले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून राहुरी-पाथर्डी मतदारसंघातील रस्त्याच्या विकास कामासाठी निधी प्राप्त करून दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द रास्ता साठी 2 कोटी 20 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत.तसेच शिरपूर ते लोमटे वस्ती फाटा ते पानसवाडी पर्यत रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2019-20 करता कामाची निवड करण्यात आली आहे.आज ती कामे मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मुळेच सुरू झाली आहेत त्यांनी पाथर्डी तालुक्यातील गावे व वाड्या-वस्त्या डांबरीकरणाने जोडले आहेत आज अनेक रस्ते त्याच्या काळातील झालेले दिसत आहे.मतदार संघातील आमदार व राज्याचे मंत्री यांनी गेल्या 2 वर्षापासून रस्त्याच्या कामासाठी एकही रुपये निधी न आणता माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मंजूर करून ठेवलेल्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करून धन्यता मानत आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे उठाठेव करत आहे स्वता आमदार व नामदार म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या भागातील रस्त्यांसाठी स्वतः किती निधी आणला हे तपासून पाहण्याची गरज आहे. विद्यामान मंत्र्यांने मतदार संघातील रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणावा व खुशाल उद्घाटने करावी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय त्यांनी घेऊ नये असे परखड मत जिल्हा परिषदेच्या सदस्य संध्याताई आठरे यांनी केले.
            मंत्री महोदयांनी गेल्या दोन वर्षापासून कुठलेही विकास कामे मतदारसंघात केली नाही, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मंजूर केलेले विकास कामांचे नारळ फक्त त्यांनी फोडले. मतदार संघातील लोकप्रतिनिधी राज्यातील मंत्रिमंडळात असतानादेखील मतदार संघ विकास कामापासून त्यांनी वंचित ठेवला आहे. दुसऱ्याने मंजूर केलेल्या विकास कामावर श्रेय लादण्यात मंत्री महोदय पटाईत आहे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे मतदार संघाचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते आहे शासनाचा विकास निधी काय असतो तो गावापर्यंत आणून जनतेला दाखवला आहे त्यामुळेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची ओळख कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आजही आहे अशी टीका पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, बाळासाहेब लवांडे, बंडू पाठक,सुरेश चव्हाण,महेंद्र शिरसाठ,संभाजी बुधवंत, सखाराम काटमोरे,डॉ.संपत कावरे,सतिष कराळे, संभाजी शिदोरे, सतिष शिदोरे,अप्पा साहेब शिदोरे,रवींद्र भापसे, मनोज ससाने व नंदकुमार लोखंडे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post