अ‍ॅड.उज्वल निकम यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर, बड्या मंत्र्याने घेतली भेट

अ‍ॅड.उज्वल निकम यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर, बड्या मंत्र्याने घेतली भेट मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अ‍ॅड उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अ‍ॅ. उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अ‍ॅड उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अ‍ॅड उज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र,  निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. आतादेखील उज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post