शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठं वक्तव्य

शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठं वक्तव्य मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु होती. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांना मित्र म्हटलं होतं. यानंतर वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना आणि भाजपमधील जवळीक याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांना विचारलं असता, कुठेही जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार पडणार का? तुम्ही भाजपबरोबर जाणार अशी चर्चा आहे? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार? माझ्या एका बाजूला हे (बाळासाहेब) बसलेत, तर दुसर्‍या बाजूला हे (अजित पवार) बसलेत मी कुठे कसा जाणार? 30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post