१२ हजारांची लाच...२ आरटीओ एजंट 'एसीबी'च्या जाळ्यात

१२ हजारांची लाच...२ आरटीओ एजंट 'एसीबी'च्या जाळ्यातधुळे: शिरपूर तालुक्यातील हाडाखेडा येथून ओडीसी वाहतूक करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी बारा हजारांची लाच घेणारे दोन  आरटीओ एजंट एसीबी च्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक एसीबीच्या पथकाने काल सायंकाळी ही कारवाई केली. दोघांविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला आर.टी.ओ. चेकपोस्ट, हाडाखेडा येथून ओडीसी वाहतूक करण्याची परवानगी मिळवून देण्याकरिता आरटीओ एजंट जयपाल प्रकाशसिंग गिरासे व छोटू भिकन कोळी यांनी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.


लाच स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही खाजगी इसमांनी आर.टी.ओ. एजंट म्हणून आर.टी.ओ.अधिकारी यांच्याकडून तत्काळ ओडीसी वाहनाची परवानगी मिळवून देण्यासाठी शासकीय फी ४ हजार रुपये असतांना तक्रारदार यांच्याकडून १२ हजार -रुपये स्वत:साठी व आर.टी.ओ. अधिकाऱ्यासाठी मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.


त्यानुसार गुरुवारी नाशिकच्या पथकाने पडताळणी केली असता, खाजगी इसमांनी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार काल एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा आरटीओ एजंट ला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुखे यांच्यासह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक साधना इंगळे, तसेच हवालदार पंकज पळशीकर, पोना वैभव देशमुख, अजय गरुड, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post