नारायण राणे यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी...'या' कॅबिनेट कमिटीत संधी

 

नारायण राणे यांचा इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये समावेशनवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता कॅबिनेट कमिट्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिट्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंपासून ते मनसुख मंडवियांपर्यंत अनेक मंत्र्यांना कॅबिनेट कमिट्यांवर घेण्यात आले आहे. 

इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि स्किलशी संबंधित कमिटीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post