राज्यातील ‘या’ सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई


 

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने  महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा  बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत.

बँकेचा परवानाच रद्द झाल्याने आता बँक ठेवीदारांना पैसे देण्यास असमर्थ होईल. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post