अडीच लाखांची लाच, PWD चे दोन अभियंते 'एसीबी'च्या जाळ्यात


अडीच लाखांची लाच, PWD चे दोन अभियंते 'एसीबी'च्या जाळ्यातधुळे: आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या झालेल्या बांधकामाचे बिल कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात 2 लाख 58 हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धुळे येथील तक्रारदार कंस्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनियर असून ते कंपनीची कामे व कंपनीचा आर्थिक व्यवहार पाहतात. नंदुरबार येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांच्याकडून आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला असून हे काम तक्रारदार नोकरीस असलेल्या धुळे येथील बांधकाम कंपनीने करारनामा करुन घेतले आहे.


वस्तीगृहाचे आतापर्यंत झालेल्या बांधकामाचे बिल कंस्ट्रक्शन कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात उपविभागीय अभियंता दिनेश पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post