गुण वाढविण्यासाठी विद्यार्थीनीकडे अश्लील मागणी, पालकांनी शिक्षकाला धुतला

 गुण वाढविण्यासाठी विद्यार्थीनीकडे अश्लील मागणी, पालकांनी शिक्षकाला धुतलापुणे : अकरावीत  शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच 12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला काळं फासून, त्याला चांगलाच चोप दिला आहे. 

मुलीने केलेल्या गंभीर आरोपानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तसंच त्याच्या तोंडाला काळंही फासलं. त्यानंतर त्या शिक्षकाला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post