'या' लावणी सम्राज्ञीला लागले आमदारकीचे वेध...थेट मागितली उमेदवारी



लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना आमदारकीचे वेध



 नांदेड :  महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे. देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे.

याआधी सुरेखा पुणेकरांनी देखील राष्ट्रवादीकडे  आमदार होण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. मात्र, सुरेखा पुणेकरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले होतं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post